अशा आमच्या प्रेमळ हर्षेमावशी ।

‘कर्णावती (गुजरात) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीला श्रीपाद हर्षे, म्हणजेच हर्षेमावशी (वय ८१ वर्षे) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यांच्यातील गुण आणि सेवेची तळमळ पाहून मला त्यांच्याविषयी पुढील कविता सुचली.

सौ. शीला हर्षे

आढावा घेत आहेत आमच्या हर्षेमावशी ।
सदैव त्यांच्या मनात असते तळमळ ।
साधकांचा आढावा घेण्याची ॥ १ ॥

त्यांच्या वक्तशीरपणामुळे ।
ओढ लागली आम्हा व्यष्टी साधनेची ।
तळमळ आहे त्यांना ।
आम्ही लवकर गुरुचरणी जाण्याची ॥ २ ॥

प्रत्येक प्रसंगात योग्य दृष्टीकोन देऊन ।
साधनेत आमचा उत्साह वाढवती ।
साधनेत साहाय्य करणार्‍या ।
अशा आमच्या प्रेमळ हर्षेमावशी ॥ ३ ॥

प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने ।
त्यांची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होऊ दे ।
अन् त्या संतपदी विराजमान होऊ देत ।
हीच प्रार्थना गुरुचरणी असे । ४ ॥’

– सौ. गीता धारप, कर्णावती, गुजरात. (१८.११.२०१९)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक