श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज ! 

श्री गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला आरंभ होणार आहे.

सातारा येथे विसर्जन मिरवणुकीत प्लाझमा, बीम आणि लेझर लाईट यांना प्रतिबंध !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आणि मिरवणूक पहाण्यास आलेल्या भक्तांच्या डोळ्याला इजा होऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहेत.

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमींनी उघड्यावर असलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा विसर्जित केल्या !

येथील ग्रामपंचायतीने भाविकांना श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही भाविकांनी त्यांच्या श्री गणेशमूर्ती दान केल्या होत्या.

पुणे महापालिकेचे भाविकांना हौदामध्ये विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन !

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारची आवाहने केली जातात. श्री गणेशभक्तांनीच हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या पुणे …

मुरुड (रायगड) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

सर्वत्रच्या हिंदूंनी मुरुड येथील गणेभक्तांच्या साहाय्यासाठी या घटनेचा निषेध करून पोलिसांवर दोषींना अटक करण्यास भाग पाडले पाहिजे !

Karnataka Congress Arrests Ganpati : बेंगळुरू पोलिसांनी आरोपींप्रमाणे श्री गणेशमूर्ती ठेवली पोलिसांच्‍या गाडीत !

कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्रोही काँग्रेसला निवडून दिल्‍याने तिच्‍या पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? या परिस्‍थितीला सर्वस्‍व राज्‍यातील हिंदूच कारणीभूत आहेत, हे आपण स्‍वीकारले पाहिजे !

भोर (पुणे) येथे १०० टक्के मूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या बसरापूर गावाचा नदी घाट यावर्षीही श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह आजूबाजूच्या अनेक गावांतून परिसरातून..

सांगली येथील पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे उत्साहात विसर्जन !

सांगलीचे आराध्यदैवत आणि पंचायतन संस्थानच्या श्री गणेशमूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपति संस्थानचा रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे सहस्रो श्री गणेशमूर्तींचे अशास्त्रीय विसर्जन !

समाजाला अशास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडणारे प्रशासन हिंदुहित कसे जपणार ?

कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी परिसरात उभारलेले ‘बॅरिकेड्स’ तोडून गणेशभक्तांकडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन !

गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून पंचगंगा नदी परिसरात असलेले ‘बॅरिकेड्स’ तोडले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले.