‘ने मजसी ने परत मातृभूमीला… !’
फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.
फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, राजगुरु यांचे नाव घेतल्यावर आपल्या मनात निर्माण होते ते खरे ‘शौर्य’ ! त्यांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित होऊन भारतमातेला हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निर्धार करावा.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार्या पोलीस निरीक्षकांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.
‘वर्ष १९०८ मध्ये सशस्त्र भारतीय क्रांतीकारकांच्या हाती एक संहारक अस्त्र गवसले, ते अस्त्र म्हणजे बॉम्ब होय. हेमचंद्र दास यांनी रशियाहून या अस्त्राची कृती मिळवून आणली.
‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे सावरकरांचे सूत्र !
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन आणि संस्थेच्या जम्मू शाखा स्थापनादिनाचे औचित्य साधून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविराेंं की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे.
देश आणि राष्ट्र यांच्याप्रती भक्ती तीव्रतम प्रेरणा देणारी ! अशा या स्वातंत्र्यवीराचे गुणगान करावे तेवढे अल्पच ! हिंदुत्वनिष्ठ आणि देशनिष्ठ या सर्वांकडून त्यांना या प्रेरणादिनी शतशः प्रणाम आणि परम आदरपूर्वक भावपूर्ण पुष्पांजली अर्पण !’
श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.