स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविरों की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन आणि संस्थेच्या जम्मू शाखा स्थापनादिनाचे औचित्य साधून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविराेंं की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास हिंदुत्वनिष्ठ वक्ते श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, तसेच ‘इक्कजुट्ट, जम्मू’ या संस्थेकडून अधिवक्ता अंकुर शर्मा आणि हिंदु राष्ट्र शक्तीचे संस्थापक कॅप्टन सिदर रिजवी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि सरकार्यवाह स्वप्नील सावरकर आदी मान्यवर उपस्थित असतील.

‘/SawarkarSmarak’ या संस्थेच्या ‘फेसबूक पेज’वर या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष चित्रीकरण (watch live) पहाता येईल.

स्थळ : कॉन्फ्रेंस हॉल, पहिला मजला, जैन स्थानक, जनरल जोरावर सिंह चौक, बहू प्लाझाच्या समोर, गांधीनगर, जम्मू.