महाविकास आघाडी सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली ! – आमदार सुधीर गाडगीळ

राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे.

मुंबईत दिवाळीत गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण

या वर्षीच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाल्याची नोंद ‘आवाज’ फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. मुंबईमध्ये गेल्या १७ वर्षांतील सर्वांत अल्प ध्वनीप्रदूषण झाले आहे.

…तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला त्यागपत्र देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल ! – अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

राज्यघटनेच्या कलम १६४ (४) नुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कायम रहाण्यासाठी पदाची शपथ घेतल्यापासून ६ मासांच्या आत विधानसभा आणि विधान परिषद यांचे सदस्य होणे आवश्यक आहे.

खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये बंद ठेवून रुग्णांची असुविधा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. त्यामध्ये वयोवृद्ध, महिला, मुले असतात. त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांनी स्वत:ची चिकित्सालये बंद करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभारूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होऊन जातो. ढोल-ताशे आदी वाद्यांचा गजर होतो; मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. आपणाला गुढीपाडवा अवश्य साजरा करायचा आहे. यंदा कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारूया

कोरोनाविषयीची माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाने जगात थैमान घातले आहे; मात्र अनेकांना त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही. कोरोनाविषयीची वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे आता एका ‘क्लिक’वर ही माहिती मिळणार आहे.

कोरोनाच्या संकटाचा कुणीही संधी म्हणून उपयोग करू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मी पोलिसांचे अभिनंदन करतो की, त्यांनी लाखो रुपयांचा ‘मास्क’चा साठा पकडला आहे. आपण थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. आपण जगणे थांबवलेले नाही, तर अधिक जगण्यासाठी जगण्याच्या शैलीत काही पालट केला आहे.

… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.