भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी ! इथेही पोलिसांनी भ्रष्टाचार केला तर . . . !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चांदीच्या पादुका आणि चंदनाच्या झाडांची चोरी

मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

जतमध्ये (जिल्हा सांगली) सराफाचे सव्वा दोन कोटी रुपयांचे सोने लुटले

यातून चोरांना पोलिसांचा धाक नाही, असेच यातून दिसते. ही स्थिती दूर करण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देणे आणि शिक्षेची कार्यवाही त्वरित करण्याची आवश्यकता आहे.

वाळू चोरी प्रकरणातील ६ जण पंढरपूर तालुक्यातून हद्दपार

अनेक गुन्हे नोंद केल्यानंतरही वाळू चोरी करणार्‍या ६ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हे आदेश काढले आहेत.

पुण्यातील मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिरातील २० ते २२ तोळे वजनाच्या सोन्याच्या हाराची चोरी

मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीवरील २० ते २२ तोळे वजनाचे सोन्याचे २ हार चोरून नेल्याची घटना ८ जानेवारीच्या पहाटे घडली.

मुंबई येथे चोरांना मारणार्‍यांवर गुन्हा

चोरांना भिऊन पळणारे पोलीस असल्यावर नागरिकांना अशी कृती कराविशी वाटली, तर त्यांना दोष कसा देता येईल ?

मळावाडी, माणगाव येथील चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळावाडी, माणगाव येथे २२ डिसेंबर २०२० या दिवशी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण १ लाख २७ सहस्र रुपयांची चोरी झाली होती.

वैद्यनाथ साखर कारखान्यातील चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अजीज इस्माईल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कह्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती अजीज इस्माईल तथा मंगलदादा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तमिळनाडूतील प्राचीन मंदिरात तोडफोड करून चोरी

गेल्या ७३ वर्षांतील सर्वच शासनकर्ते मंदिरांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले असल्याने मंदिरांच्या सुरक्षेसाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

देशातील १८७ उपाहारगृहांतून लाखो रुपयांच्या सामानाची चोरी करणार्‍याला अटक

महागडे कपडे घालून श्रीमंत गिर्‍हाईक असल्याचे भासवून देशातील १८७ उपाहारगृहांत चोरी करणार्‍या डॉनिल झोन या सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे.