
नवी मुंबई – महागडे कपडे घालून श्रीमंत गिर्हाईक असल्याचे भासवून देशातील १८७ उपाहारगृहांत चोरी करणार्या डॉनिल झोन या सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे.
डॉनिल याने वाशी येथील तुंगा उपाहारगृहात येऊन स्वत:च्या आस्थापनाची बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने हॉटेल प्रशासनाकडून महागडा भ्रमणसंगणक आणि महागडी दारूही मागवून घेतली. तसेच चांगल्या प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यास त्याने सांगितले. त्यानुसार हॉटेल प्रशासनाने सर्व सिद्धता केली; मात्र ऐनवेळी डॉनिल याने तेथून पळ काढला. हे लक्षात येताच उपाहारगृहाच्या मालकाने वाशी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण पडताळून डॉनिल यांना घोडबंदर येथून अटक केली. अधिक चौकशीत त्याला देशातील १८७ उपहारगृहांत अशाच प्रकारे चोरी केल्याचे सांगितले. आतापर्यंत लाखो रुपयांचे सामान चोरल्याचे तपासात उघड झाले आहे.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !