
सिंधुदुर्ग (जि.मा.का) – कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळावाडी, माणगाव येथे २२ डिसेंबर २०२० या दिवशी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण १ लाख २७ सहस्र रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपी संदीप उपाख्य बंड्या दाजी गुंजाळ याला अटक केली आहे.
या प्रकरणाची २२ डिसेंबर २०२० या दिवशी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती. आरोपी गुंजाळ हा सावंतवाडी येथे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली होती. त्यानुसार २ जानेवारी २०२१ या दिवशी सापळा रचून गुंजाळ याला अटक करण्यात आली. आरोपी गुंजाळ याने गुन्हा मान्य केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माजगाव येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावून चोराचे पलायन

सावंतवाडी – शहरातील सालईवाडा येथील श्रीमती कांचन अनिल शिरसाट या १ जानेवारीला सकाळी फिरण्यासाठी माजगाव दत्तमंदिर परिसरात गेल्या होत्या. त्या वेळी अचानक आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यानंतर शिरसाट यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !