मुंबई येथे चोरांना मारणार्‍यांवर गुन्हा

  • चोरांना भिऊन पळणारे पोलीस असल्यावर नागरिकांना अशी कृती कराविशी वाटली, तर त्यांना दोष कसा देता येईल ?
  • पोलीस नागरिकांचा विश्‍वास संपादन करण्यास न्यून पडले आहेत, याचेच हे लक्षण आहे !
  • नागरिकांना कायदा हातात घेण्याची वेळ का आली याचा पोलिसांनी अंतर्मुखतेने विचार केला पाहिजे !

मुंबई – कांदिवलीमध्ये स्थानिकांनी चोरांना रंगेहात पकडून मारहाण केली. या प्रकरणी १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांनी या चोरांना विवस्त्र करत त्यांचे मुंडन करून धिंड काढली होती.