गेल्या ७३ वर्षांतील सर्वच शासनकर्ते मंदिरांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले असल्याने मंदिरांच्या सुरक्षेसाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
थंजवूर (तमिळनाडू) – येथील थिरुविदाइमरुथुर भागात असणार्या ३५० वर्षे प्राचीन आनंदवल्ली समेथा भास्करेस्वरार मंदिरामध्ये अज्ञातांनी तोडफोड करून मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील मंगळसूत्र आणि अन्य मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मंदिराचे व्यवस्थापक कृष्णासामी यांना मिळाल्यावर ते घटनास्थळी पोचले. त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी अन्वेषण चालू केले.
तमिलनाडु: 350 साल पुराने मंदिर में तोड़फोड़, ‘मंगलसूत्र’ चोरी#TamilNadu https://t.co/uGyjubf2sM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 20, 2020
१. मंदिराचे पुजारी शिवानंदियार सेनाथीपति रात्री मंदिराच्या दराला कुलूप लावून गेले होते. दुसर्या दिवशी सकाळी मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उघडल्यावर मंदिराच्या दाराचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. मंदिरामध्ये सोने आणि चांदी यांच्या वस्तू गायब झाल्याचे त्यांना दिसून आले, तसेच येथे तोडफोड करण्यात आल्याचेही आढळले.
२. याविषयी स्थानिक ‘कथिर न्यूज’ वृत्तवाहिनीने म्हटले की, मंदिराकडून अनेकदा तक्रार करूनही मंदिराच्या कोष विभागाने येथे सुरक्षारक्षक तैनात केले नाहीत. ‘प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच येथे चोरी झाली’, असा आरोपही भाविकांनी केला.