हिंदुत्वनिष्ठ नेते प्रीत सिंह यांना जामीन संमत

देहलीच्या जंतर मंतर येथील आंदोलनात कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याचे प्रकरण

डावीकडून ‘सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रीत सिंह

नवी देहली – येथील जंतर मंतरवर ऑगस्ट मासामध्ये ‘भारत जोडो आंदोलन’च्या वेळी मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले ‘सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रीत सिंह यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. सिंह यांचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला.

हिंदु राष्ट्राची मागणी लोकशाही व्यवस्थेमध्ये चुकीची नाही !

मागील सुनावणीच्या वेळी प्रीत सिंह यांनी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्राच्या मागणीला योग्य असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, भारतातील लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी म्हणजे धर्मांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासारखे नाही. त्यामुळे मी माझ्या मागणीवर ठाम आहे. जर न्यायालयाला हे चुकीचे वाटते, तर मी जामीन मागणार नाही.