कायद्याच्या दृष्टीने ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे तज्ञांचे मत !

‘फास्ट ट्रॅक कोर्टा’मध्ये प्रलंबित खटल्यांमध्ये उत्तरप्रदेश प्रथम क्रमांकावर, तर महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. संपूर्ण देशात अशा न्यायालयांत १ लाख ६३ सहस्रांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. असे असेल तर त्या ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’चा उपयोग काय?

न्यायालयात निर्दाेष; मात्र संकेतस्थळावर आरोपीच !

फौजदारी गुन्ह्यामध्ये निर्दोष सुटल्यावरही न्यायालयाच्या नोंदीमध्ये आणि ‘गूगल’सारख्या ‘सर्च इंजिन’वर त्या व्यक्तीवरील सर्व आरोपांची माहिती आढळून येते. तेथे त्याचे नाव एक आरोपी म्हणून नोंदवले गेलेले असते. त्यामुळे तो निर्दाेष असतांनाही त्याची मानहानी होते.

श्री गजानन महाराज संस्थानच्या ‘आनंदसागर’ या प्रेक्षणीय स्थळाच्या विरुद्धची याचिका उच्च न्यायालयातून निकाली !

शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या ६५० एकर जागेत वसलेल्या ‘आनंदसागर’ या प्रेक्षणीय स्थळाच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका येथील खंडपिठाने निकाली काढून याचिकाकर्ता अशोक गारमोडे यांना १० सहस्र रुपयांचा दंड दिला आहे.

नवरात्रौत्सवामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या शासनाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास ओडिशा उच्च न्यायालयाचा नकार !

श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

असे संपूर्ण देशात करा !

ज्यांनी तमिळनाडूतील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका….

मंदिरांच्या भूमी बळकावणार्‍यांना ‘गुंडा कायद्यां’तर्गत बेड्या ठोका ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

आज मंदिरांचे सरकारीकरण करणारा कायदा आहे; पण हिंदु राष्ट्रात मंदिरे भक्तांच्याच कह्यात ठेवणारा कायदा असेल !

प्रौढ व्यक्तींचे धर्म वेगळे असले, तरी त्यांना वैवाहिक जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार ! –  अलाहाबाद उच्च न्यायालय

आमच्या विचारानुसार त्यांच्या नातेसंबंधावर कुणीही, अगदी त्यांचे पालकही आक्षेप घेऊ शकत नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला.

कोरोना नियमांचे पालन करून चारधाम यात्रा प्रारंभ करा ! – उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश

उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोरोना नियमावलीचे पालन करून चारधाम यात्रा चालू करण्याचा आदेश दिला आहे. जून मासामध्ये या यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे नव्हे !

कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही.

तमिळ भाषा देवतांशी संबंधित असल्याने पूजा करतांना तिचाही वापर व्हावा ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळ जगातील प्राचीन भाषा आहे. तसेच ती ईश्‍वरीय भाषाही आहे. तमिळ भाषेचा जन्म भगवान शिवाच्या डमरूमधून झाला. पौराणिक कथेनुसार शिवाने पहिल्या अकादमीचे (प्रथम तमिळ संगमचे) अध्यक्षपद सांभाळले.