काशी विश्वनाथ मंदिराविषयी चालू असलेला वाद आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याची भूमिका
श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या न्यायालयीन वादाविषयीची नियमित सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात २९ मार्चपासून चालू झाली आहे. न्यायालयात नक्की काय चालले आहे, याची खरी माहिती जनतेला असायला हवी. ‘जनमत’ भारतात आता कळीचे सूत्र झाले आहे. म्हणूनच आपण सजग नागरिक म्हणून या वादाविषयी जरा समजून घेऊ.