अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध
साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ? – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय (बी.बी.ए.यू.) येथे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) या साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेकडून लावण्यात आलेल्या पत्रकांमध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत.
‘विश्वविद्यालयाच्या परिसरात असलेले मंदिर हटवण्याची मागणी करत, ‘जर येथे मंदिर आहे, तर मशीदही बनवली पाहिजे’, अशी मागणी या पत्रकांद्वारे करण्यात आली आहे. ‘विश्वविद्यालय प्रशासन परिसराचे भगवेकरण करू पहात आहे. येथे रा.स्व. संघाचे कार्यालय उघडू इच्छित आहे.
BBAU students protest building gaushala on campus https://t.co/qihkQuoX9n
— HT Lucknow (@htlucknow) April 13, 2022
हे विश्वविद्यालय गोशाळा नाही, तर प्रयोगशाळा असली पाहिजे’, असेही या संघटनेने म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याचा विरोध केला आहे.