ढेबेवाडी (सातारा) वन्यजीव विभागाच्या वनरक्षकाची आत्महत्या !

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार्‍या समाजातील लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

वीजदेयकावरून भाजपच्या माजी आमदारांचा महावितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न !

शेतीपंपाची वीजजोडणी महावितरण खंडित करत आहे. या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांनी दिलेल्या निवेदनांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन आंदोलन चालू असतांना गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

वर्ष २०२० मध्ये देशात आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत वाढ !

जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आरंभीपासूनच जनतेला साधना शिकवली असती, तर जीवनातील प्रत्येक संकटाकडे कोणत्या दृष्टीने पहावे ? आणि त्यातही कसे आनंदी रहावे ? हे जनतेला कळले असते !

भारत, अमेरिका यांच्यासह जगात पुरुषांमध्ये अविवाहित रहाण्याचा विचार होत आहे प्रबळ !

भारतात प्रत्येक घंट्याला २७ सहस्र, तर प्रत्येक मासाला ८ लाखांहून अधिक विवाह होत असतात; मात्र भारतासह जगभरात सध्याच्या पुरुषांमध्ये विवाह न करण्याचा विचार प्रबळ होत आहे, असे समोर आले आहे.

एस्.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या न करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन !

मी आत्महत्या करणार्‍यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना केले.

चंद्रपूर येथे बस कर्मचार्‍याची विष प्राशन करून आत्महत्या !

राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी १३ दिवसांपासून महामंडळातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांनी ‘काम बंद’ आंदोलन चालू केले आहे.

‘फेसबूक’च्या काल्पनिक जगाची भयावहता !

‘फेसबूक’ या आस्थापनाने ‘मेटा’ हे नाव आता धारण केले आहे. केवळ पैशांसाठी ग्राहक वाढतात म्हणून द्वेषपूर्ण टीका, भांडणे लावणे, हिंदुद्वेष आदी गोष्टी फेसबूकवर चालू दिल्या जात असल्यामुळे फेसबूकची जगात अपकीर्तीही होत आहे. त्यामुळे नाव पालटण्यामागे काही धोरणे पालटणे, प्रतिमा सुधारणे हा फेसबूकचा उद्देश आहे.

देशात आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ !

जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांना जीवन जगण्याचा उद्देश सांगितला न गेल्याने आणि समाजाला आनंदी जीवन जगण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण न केल्यामुळे होणार्‍या या आत्महत्यांना आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !

नगर येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारातील चालकाची बसच्या शिडीला गळफास लावून आत्महत्या

हा प्रकार २९ ऑक्टोबर या दिवशी उघडकीस आला. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात ते सहभागी झाले होते.