धर्मांधाच्या त्रासाला कंटाळून हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

अंबाजोगाई (जिल्हा बीड) – बारावीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनीने अकबर बबन शेख याच्या त्रासाला कंटाळून १० मे या दिवशी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे ही घटना घडली आहे. (संबंधित धर्मांधाची चौकशी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थिनीला न्याय मिळावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा ! – संपादक) मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या घराच्या शेजारी रहाणारा अकबर शेख हा युवक मागील काही दिवसांपासून मुलगी संगणकाच्या शिकवणीवर्गाला जात असतांना तिला छेडत होता. ६ मे या दिवशी मुलीच्या वडिलांनी अकबरला बोलावून तिला त्रास न देण्याविषयी बजावले होते. तरीही त्याचे त्रास देणे चालूच होते.