परीक्षेच्या ताणामुळे ११ वी इयत्तेत शिकणार्‍या फोंडा येथील विद्यार्थिनीची आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी समाजाला साधना शिकवणे आवश्यक ! व्यावहारिक अपयशामुळे, भीतीने ताण येणे, खचून जाणे, निराशा येणे या गोष्टींमुळे असे टोकाचे पाऊल उचलले जाते ! व्यावहारिक शिक्षणाबरोबर साधनाही शिकवणे आवश्यक आहे.

अहेरी (जिल्हा गडचिरोली) येथे स्वतःवर गोळ्या झाडून सैनिकाची आत्महत्या !

सैनिकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे. त्यासाठी साधना आणि अध्यात्म यांची जोड देणेच महत्त्वाचे आहे !

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या !

आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

विनाशिरस्त्राण असणाऱ्यांना पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करावा !

नाशिक येथील पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्राद्वारे मागणी !

परभणी येथे गावगुंडांच्या सतत होणाऱ्या त्रासामुळे पती-पत्नी यांनी घेतला गळफास !

पोलिसांनी गुंडांच्या विरोधात कारवाई केली का केली नाही ? पती-पत्नी यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलेपर्यंत पोलीस निष्क्रीय का राहिले ?, याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

बनासकांठा (गुजरात) येथील सीमेवर सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या !

भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या भोमाराम रूगाराम या सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

विलिनीकरणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ !

विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह कर्मचार्‍यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारणार कि नाही ? याविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे सैनिकाकडून सहकार्‍याची हत्या करून आत्महत्या

एक दिवसापूर्वीच पंजाबच्या अमृतसरमध्येही अशीच घटना घडली होती. यात सैनिकाने ४ सहकार्‍यांना ठार करून आत्महत्या केली होती.

अमृतसरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात एका सैनिकाने सहकारी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ४ सैनिक ठार, तर २ जण घायाळ

सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात ६ मार्चला सकाळी भोजनकक्षामध्ये १४४ बटालियनचे सैनिक अल्पाहार करत होते. या वेळी एका सैनिकाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले.

हंगेरियन गाणे ऐकून नांदेड येथील तरुणाच्या मनात आत्महत्येचा विचार आल्याने तरुणावर मानसोपचार चालू !

कुठे आत्महत्येस प्रवृत्त करणारे विदेशी संगीत, तर कुठे सकारात्मकता वाढवणारे दैवी भारतीय संगीत ! संगीताचा व्यक्तीवर केवळ मानसिकच नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही परिणाम होतो.