आयोवा (अमेरिका) येथे दोन महिलांची हत्या करून बंदूकधार्‍याने केली आत्महत्या !

डेमॉईन (अमेरिका) – अमेरिकेतील आयोवा राज्यात असलेल्या एमेस शहरात २ जूनच्या रात्री येथील ‘कॉर्नरस्टोन चर्च’जवळ एका बंदूकधार्‍याने दोन महिलांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी चालवल्याने त्याचाही जागेवरच मृत्यू झाला.

(अमेरिकी समाज हा उच्चशिक्षित आणि सुधारणावादी समजला जातो; मात्र या समाजात ‘बंदूक कुसंस्कृती’ वाढत असून त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. भारतियांनी अशा समाजाचे अंधानुकरण करणे म्हणजे आत्मघात होय ! – संपादक) तिघांची ओळख अजून पटलेली नाही. यासदंर्भात पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत.