येणार्‍या काळात एन्.जी.ओ.ना मोठ्या संधी असणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

केंद्रशासनाने घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामध्ये एन्.जी.ओ.ना (स्वयंसेवी संस्था) मोठ्या संधी असणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

ठाणे कारागृहातील कर्मचार्‍याला कोरोनाची लागण

ठाणे मध्यवर्ती कारागृहात २३ मे या दिवशी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ मासाने येथील एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे.

‘आतंकवादाशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर पूर्णपणे बंदी घाला !’

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा आतंकवादाशी संबंध आहे. या संघटनेवर गोव्यात पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी ‘श्री परशुराम सेना’ या राष्ट्रप्रेमी संघटनेने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची २९ मे या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नायर रुग्णालयात डोक्यावर पंखा पडल्याने निवासी डॉक्टर घायाळ

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नायर रुग्णालयातील एका इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतांना ती रुग्णांसाठी खुली करण्यात आली.

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणार्‍या बसचालकवर गुन्हा नोंद

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.

कोरोनाच्या वैश्‍विक संकटात दिसलेली दानशूरता !

या सदरात आज गोव्यातील एक पंचायत मंडळ आणि गुरुद्वार कसे साहाय्य करत आहेत, याचा वृत्तांत पाहूया ! कुंडई पंचायत मंडळाकडून साहाय्य आणि आवाहन !

… तरच सिंधुदुर्गचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश होईल ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १४ एप्रिल या दिवशी सर्व उत्तरदायी अधिकार्‍यांनी कार्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक होते; पण आतापर्यंत जे सेवेत रुजू झाले नाहीत, अशा अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाईल

वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या दोघांना अटक

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !

कल्याण येथे शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक परिचारिकेकडून होणारा बायबलचा प्रचार हिंदुत्वनिष्ठांंनी थांबवला !

प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित ! पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.

शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पोलिसांना चहापान

जिवाचे रान करून सेवा बजावणार्‍या उचगाव फाटा, उचगाव ‘हायवे ब्रीज’, तावडे हॉटेल चौक परिसरातील कामावर असणार्‍या पोलिसांना, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चहापान देण्यात आले.