वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या दोघांना अटक

  • कायद्याचा धाक नसलेले आपत्कालीन स्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात !
  • पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !

वसई – येथे काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर गाडी नेल्याचा प्रकार घडलेला असतांनाच २७ मार्चला वसईत आणखी एका पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वसई गावातील बसआगाराजवळ गस्तीवर असलेले पोलीस शिपाई अनिल ओंबासे यांनी येथे उभ्या असलेल्या ३ तरुणांना हटकले असता त्यांच्याशी या तरुणांनी वाद घालून त्यांच्यावर काठीने आक्रमण केले. या आक्रमणात ओंबासे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विशाल डिकोना आणि बृनोल डिकोना या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.