‘आतंकवादाशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर पूर्णपणे बंदी घाला !’

‘श्री परशुराम सेने’ची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘श्री परशुराम सेने’चे पदाधिकारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (डावीकडे) यांना निवेदन देतांना

पणजी, २९ मे (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा आतंकवादाशी संबंध आहे. या संघटनेवर गोव्यात पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी ‘श्री परशुराम सेना’ या राष्ट्रप्रेमी संघटनेने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची २९ मे या दिवशी भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी ‘श्री परशुराम सेने’चे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलींगकर आदींची उपस्थिती होती.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे केंद्रशासनाच्या अन्वेषणातून सिद्ध झाले आहे. सध्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे सदस्य गोव्यात मुक्तपणे वावरत आहेत आणि यामुळे गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडू शकतो.’