१० ते १२ मार्च या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संचारबंदी !

महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

(म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे, हे गंभीर आहे !’

ज्या बाबराने अनेक हिंदूंची हत्या केली, तसेच अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली, त्या बाबराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करायला हवे, असे अबू आझमी यांना वाटते का ?

हज हाऊसच्या बांधकामाला कायमस्वरूपी स्थगिती द्या ! – समस्त हिंदू आघाडी

हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना नवीन हज हाऊसच्या निर्मितीसाठी जागा देणे म्हणजे देशातील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखेच नाही का ? असे असतांना अशी मागणी का करावी लागते ?

सनदी अधिकार्‍यांसह १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६ कोटी ७३ लाख ५५ सहस्र ९४६ रुपयांचा घोटाळा

कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर चक्कर येऊन भिवंडी येथे एकाचा मृत्यू

कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुखदेव किर्दत (वय ४१ वर्षे) यांचा २ मार्च या दिवशी मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले.

हिंदूंना सुरक्षितता आणि संरक्षककवच देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल ! – मंगलप्रभात लोढा, आमदार

मुसलमानांच्या सततच्या त्रासामुळे मालवणी (मुंबई) येथील हिंदूंची संख्या अल्प झाली ! महाराष्ट्रातील मौलवी, फादर यांच्याविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत आहे का ? केवळ हिंदूंना लक्ष्य केले जाते. सध्याचे सरकार हिंदूंच्या समर्थनाने निवडून आले आहे.

लाच स्वीकारणार्‍या महावितरणच्या साहाय्यक अभियंत्याला अटक !

ठेकेदार उमेश माळी यांच्याकडून लाच स्वीकारतांना येथील वीज महावितरण आस्थापनाच्या कार्यालयात साहाय्यक अभियंता सुनील चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाविरोधात व्यापक जनजागृतीसह कडाडून विरोध करण्याचा विश्‍वस्तांचा निर्धार !

बेळगाव येथे देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ कर्नाटकच्या वतीने मंदिर विश्‍वस्तांची बैठक.

वसतीगृहातील महिलेसमवेत अपप्रकार केल्याच्या घटनेत तथ्य नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

जळगाव येथील आशादीप वसतीगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर !

कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता

नागपूर ते भाग्यनगर येथे कत्तलीसाठी नेणार्‍या ४२ गोवंशियांची मुक्तता कळंब येथील पोलीस ठाण्याकडून करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून २ मोठ्या ट्रकमधून रात्री साधारणतः १ वाजता ४२ गोवंशियांचे प्राण वाचवले.