कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर चक्कर येऊन भिवंडी येथे एकाचा मृत्यू

  • ”  चौकशीची मागणी ” 

  • अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

भिवंडी, ४ मार्च (वार्ता.) – कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुखदेव किर्दत (वय ४१ वर्षे) यांचा २ मार्च या दिवशी मृत्यू झाला. लस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुखदेव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेच्या चौकशीची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.आर्. खरात यांनी दिली आहे.