सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ !

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले.

पंढरपूर – मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिल या दिवशी मतदान, तर २ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.

सोलापूर येथे महिलादिनानिमित्त धर्मप्रेमी युवतींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

प्रत्येक युवतीने स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे

पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील थेऊरफाटा येथील हॉटेल मॅजेस्टिक या हॉटेलवर धाड टाकून तेथे अवैधरित्या चालणार्‍या हुक्का पार्लरवर कारवाई करत ४४ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई २४ फेब्रुवारी या दिवशी केली.

१ मार्चपासून सप्ताहातील पाच दिवस सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस धावणार !

अकरा मासांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस १ मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ५ परिवार देवता मंदिरांच्या जिर्णोद्धार कामाचे भूमीपूजन

५ परिवार देवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार आणि श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाचे सुशोभिकरण या कामांचे भूमीपूजन २५ फेब्रुवारी या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात नियमावली जाहीर

शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने मंगल कार्यालय, हॉटेल, जीम, बाग, कोचिंग क्लासेस आणि दुकाने या ठिकाणी नियमाहून अधिक गर्दी आढळल्यास दंड आणि एक मासासाठी दुकान सील करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे भाजपच्या नेत्याला काळे फासणार्‍या २५ शिवसैनिकांवर गुन्हा नोंद

वीजदेयक वसुलीविरुद्ध आंदोलनात भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते.