पंढरपूर – मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिल या दिवशी मतदान, तर २ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे. २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून ३० मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नसून महापालिकेसह संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू झाल्याचे पत्र सर्व कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे १७ मार्चपासून आचारसंहितेची अंमलबजावणी होईल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.