नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि १ मासासाठी दुकान सील करण्यात येणार
सोलापूर – शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने मंगल कार्यालय, हॉटेल, जीम, बाग, कोचिंग क्लासेस आणि दुकाने या ठिकाणी नियमाहून अधिक गर्दी आढळल्यास दंड आणि एक मासासाठी दुकान सील करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे. यासमवेतच मिरवणुका, यात्रा, स्पर्धा, मोर्चा, उपोषण आणि सामूहिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त
पी. शिवशंकर यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये नवे निर्बंध लागू केले आहेत.
१. विवाह सोहळ्यास अनुमती बंधनकारक असून केवळ ५० जणांना सोहळ्यासाठी अनुमती असणार आहे. मंगल कार्यालयात होणारे विवाह आणि अन्य समारंभ यांची विभागीय कार्यालयाने प्रतिदिन पडताळणी करावी. तेथे नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोटीस देऊन १० सहस्र रुपये दंड करावा, तर दुसर्यांदा उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय १ मासासाठी सील करावे.
२. श्री सिद्धेश्वर मंदिरात प्रतिदिन ५०० भाविकांना प्रवेश देण्यास अनुमती असेल, तर मठांमध्ये २० जणांना अनुमती असणार आहे. शासकीय कार्यालयातही गर्दी करता येणार नाही.