सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या परिसरात जमावबंदीचा आदेश
यात्राकाळात केवळ पासधारक भाविकांनाच धार्मिक विधीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल. लोकप्रतिनिधी आणि अतीमहनीय व्यक्ती यांनाही यात्राकाळात प्रवेश देण्यात येणार नाही. ग्रामीण भागातून यात्रेसाठी भाविकांनी शहरात येऊ नये यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस यांंच्या संयुक्त पथकांद्वारे शहराभोवती नाकाबंदी करण्यात येणार आहे