महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

मुंबई – लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक २ सहस्र ८१८, तर मुंबई उपनगरातून २ सहस्र ३३१ तक्रारी करण्यात आल्या आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून करण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. नागालँड येथून निवडणूक आयोगाकडे केवळ १८, तर गुजरात राज्यातून एकूण ७ सहस्र १२४ तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे एकूणच करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न होणे, मतदार ओळखपत्रात चुका असणे, मतदारसूची नाव नसणे आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश अधिक आहे.