दार उघड बये दार उघड …!
‘वेळ आल्यावर स्वत:चा पिता, पुत्र, भाऊ, पती या सर्वांनाही सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे !’ ती स्वतःच दिशाहीन होऊन कसे चालेल ?
‘वेळ आल्यावर स्वत:चा पिता, पुत्र, भाऊ, पती या सर्वांनाही सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे !’ ती स्वतःच दिशाहीन होऊन कसे चालेल ?
महिलेच्या पिशवीतील शॅम्पूच्या २ बाटल्यांमध्ये ५० पिवळ्या रंगाच्या सीलबंद गोळ्या लपवल्या होत्या. त्यांत पांढर्या पावडरच्या स्वरूपात कोकेन भरले होते. गुप्त माहितीच्या आधारे १२ एप्रिल या दिवशी नागपूर रेल्वेस्थानकात सापळा रचण्यात आला.
कोकण रेल्वेच्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गेल्या वर्षभरात प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये विसरलेले ५३ लाख रुपयांचे सामान प्रवाशांना परत केले आहे.
प्रकाशझोतात मासेमारी करणार्या नौकांवर कारवाईसमवेत संबंधितांना दंडाची शिक्षा तत्परतेने झाल्यास अशा मासेमारीला थोडा तरी आळा बसेल !
इसिस, अल कायदा इत्यादी जागतिक स्तरावर कुप्रसिद्ध असलेल्या आतंकवादी संघटनांच्या अवैध कारवायांमुळे भारत आतंकवादाचा कसा पीडित ठरला आहे, हे ‘प्रहार’विषयीच्या धोरणांमध्ये स्पष्ट केले आहे.
एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने रस्त्यावरून जाणारा एक माणूस आणि दुचाकीवरून जाणारा एक जण यांना दांड्याने डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनतेच्या सुरक्षेविषयी अशा प्रकारे निष्काळजी असणार्या एजन्सीवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ भारतीय जलक्षेत्रात प्रवेश केलेली पाकिस्तानी मासेमारी नौका ‘अल मदीना’चा पाठलाग करून कह्यात घेतली.
पुणे येथे सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी मंदिर परिसरात बेघर लोकांनी पदपथावर अतिक्रमण करून तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था केली आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. भाविकांच्या मागे लागून बेघर लोक पैसे (भीक) मागतात.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्या प्रवाशांच्या सामानाची पडताळणी सुरक्षारक्षकांकडून होणार आहे. या पडताळणीत स्कॅनरद्वारे पडताळणी होईल.