मणीपूरमध्ये नव्याने झालेल्या हिंसाचारात ३ जण ठार !

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई  (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे. तेरखोंगसांगबी कांगवे आणि थोरबुंग येथे हिंसक संघर्ष झाला. या भागात कुकी आणि मैतेई समुदाय यांच्यातील सीमा आहे.