सांगली येथे भाजपच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

विधानसभा निवडणूक २०२४

सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल किनीचे यांच्याकडे उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले. या वेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील, नितीन शिंदे, माजी आमदार रमेश भाऊ शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, भाजपचे नेते मुन्ना कुरणे, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. नीताताई केळकर, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सरचिटणीस अविनाश मोहिते आदी मान्यवर, तसेच भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.