सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात रहाणार्या एका हिंदु विवाहितेला ३ धर्मांधांनी कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देऊन सांगली येथे ठिकठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीवरून सांगली शहर पोलिसांनी संशयित फजल पटेल, अल्ताफ करीम आणि फजलचा भाऊ अल्फाज या तिघांवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. ही घटना मार्च ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली आहे.
१. पीडित महिलेची ओळख संशयित फजल पटेल याच्याशी झाल्यानंतर त्याने तो रहात असलेल्या घरी पीडितेला बोलावून घेतले. कोल्ड्रिंक पिण्यास दिल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. शुद्धीवर आल्यानंतर त्या निर्वस्त्र असल्याचे त्यांच्या लक्षात आले, तसेच शेजारी फजल आणि अल्ताफ करीम हेही निर्वस्त्र अवस्थेत होते. (अशा वासनांध धर्मांधांना फाशीची दिली पाहिजे ! – संपादक)
२. पीडितेने त्या दोघांना जाब विचारला असता फजल पटेल याने पीडितेच्या गळ्याला चाकू लावून कुणाला काही सांगितल्यास पती आणि मुले यांना ठार मारण्याची धमकी दिली.
३. यानंतर संशयित पटेल याने वेळोवेळी व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. सप्टेंबरमध्ये पीडितेला बोलावून घेत व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन बळजोरीने गाडीमध्ये घातले.
४. गाडी मिरज येथे आल्यानंतर पीडितेने तेथून पळ काढला. यानंतरही संशयित पटेल याने पीडिता आणि साक्षीदार यांना भ्रमणभाष करून जिवे मारण्याची धमकी दिली. संशयित धर्मांधांचा पोलिसांनी शोध चालू केला आहे.
संपादकीय भूमिका :
|