चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा विवाह सुनिश्‍चित झाल्याची आनंदवार्ता ऐकल्यावर कवितांच्या माध्यमातून त्यांच्या सहसाधकांचा झालेला संवाद

स्वाती नक्षत्रातील पावसाने शिंपल्यात होतो मोती ।
संदीप-स्वाती हे दोन मोती विराजू दे श्रीविष्णूच्या मुकुटी । हीच प्रार्थना गुरुचरणी ॥

गौरीगद्दे (कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.

‘हिंदु राष्ट्राचा संसार करायचा आहे’, असे उच्च ध्येय ठेवणार्‍या सौ. वेदश्री हर्षद खानविलकर अन् शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे श्री. हर्षद खानविलकर !

श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांना विवाहाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महासुदर्शन यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

‘२३ ते २५.१०.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात महासुदर्शन याग झाला. त्या वेळी साधक पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्या अनुभूती देत आहोत . . .

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘उग्र प्रत्यंगिरायागा’च्या वेळी शरिरांत होणार्‍या वेदना नष्ट झाल्याचे अनुभवणे

‘४.११.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘उग्र प्रत्यंगिरा याग’ झाला. तेव्हा मला देवीचे मुख सिंहरूपात दिसत होते. ‘त्या वेळी देवी माझी पाठ, पाय आणि पोटर्‍या पहात आहे. देवी त्या भागातील अनिष्ट शक्ती बाहेर काढत आहे’, असे मला जाणवले.

समाजातील विवाह समारंभ आणि सनातन आश्रमातील विवाह सोहळा पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते.

ब्रह्मास्त्र यज्ञाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ब्रह्मास्त्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी युरोप येथील साधिका सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना श्री. अशोक दहातोंडे यांना स्वतःत जाणवलेले पालट

पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.

भावप्रयोगाच्या वेळी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कु. तेजल पात्रीकर यांना ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ।’ याची अनुभूती येणे

हनुमान जयंतीला सायंकाळी संगीत सेवेचा आढावा झाल्यानंतर आम्ही सर्व साधिकांनी एक भावप्रयोग केला. तेव्हा मला भावप्रयोग करत असलेल्या सर्व साधिकांच्या हृदयात परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मित हास्य करणार्‍या रूपाचे दर्शन झाले.

श्री बगलामुखी यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री बगलामुखी यज्ञाच्या पहिल्या दिवशी प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्या वेळी मला ‘स्वर्गलोकाचे द्वार उघडले गेले असून देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवले.