आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘सकाळी चहा समवेत बिस्किटे खायला बहुतेक सर्वांनाच आवडते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने बाहेरील बेकरीत बनवलेली आणि सनातनच्या रामनाथी आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात साधकांना बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे (प्रत्येकी २ बिस्किटे) खाण्यास दिली, तर दुसर्या प्रयोगात त्यांना सनातनच्या आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली (प्रत्येकी २ बिस्किटे) खाण्यास दिली. दोन्ही प्रयोगांत साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
(भाग १)
प्रयोगाचा निष्कर्ष
एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो. आश्रमातील बेकरीत बनवलेली बिस्किटे सात्त्विक असल्याने ती खाल्ल्याने साधकांना चांगल्या अनुभूती आल्या.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१२.२०२०)
ई-मेल : [email protected]
आधुनिक आहाराच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी घरी बनवलेले भारतीय अन्नपदार्थांचे सेवन करा !‘सध्या आधुनिक जगामध्ये आहाराविषयी धर्मशास्त्राने सांगितलेले नियम न पाळल्याने जेवढे तोटे होतात, त्यापेक्षा अधिक तोटे आधुनिक आहारपद्धत स्वीकारल्यामुळे होत आहेत. घरी गृहिणींच्या हातचे भोजन किंवा अल्पाहार (नाश्ता) घेण्यापासून आपण दूर जात आहोत. पाव-केक, बिस्किटे, ‘सॉस’ अन् ‘जॅम’ आले आहेत. कृत्रिम शीतपेये असोत; पिझ्झा, बर्गर यांसारखे ‘फास्ट फूड’ असो किंवा ‘कुरकुरे’सारखे ‘जंक फूड’ असो, (जंक म्हणजे टाकाऊ) त्यांचे अनेक दुष्परिणाम सध्याच्या पिढीवर दिसून येतात. त्यामध्ये लठ्ठपणा, पचनसंस्थेचे आणि श्वसनसंस्थेचे विकार यांसारख्या अनेक शारीरिक अडचणींना समोरे जावे लागते. असे पदार्थ सेवन करण्याचा सर्वांत मोठा तोटा, म्हणजे त्रासदायक शक्ती आकर्षित करणारे हे तमोगुणी पदार्थ सातत्याने सेवन करणारी व्यक्ती वाईट शक्तींच्या त्रासाला बळी पडते. आधुनिक आहाराचे शारीरिक दुष्परिणाम केवळ या जन्मापुरतेच भोगावे लागतात; परंतु त्यांमुळे होऊ शकणारा अनिष्ट शक्तींचा त्रास मात्र जन्मोजन्मी पाठ सोडत नाही. सर्वांनी घरी बनवलेले भारतीय अन्नपदार्थ खावेत. ते ताजे, पचण्यास हलके आणि पौष्टिक असतात. त्यामुळे अन्नातील नैसर्गिक तत्त्वे आणि जीवनसत्त्वे नष्ट होणार नाहीत, तसेच हे पदार्थ खाल्ल्याने मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले रहाण्यास साहाय्य होते.’ (याविषयीची शास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट होण्यासाठी सनातन निर्मित ‘आधुनिक आहाराचे तोटे’ या ग्रंथात दिली आहेत.) |
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/435197.html