संघर्षातून हिंदु धर्माचे पुनरुत्थान शक्य ! – बिनील सोमसुंदरम्, केरळ

श्री. बिनिल सोमसुंदरम्

केरळमधील शबरीमला मंदिराची परंपरा आणि पवित्रता भ्रष्ट करण्यासाठी हिंदुविरोधी, निधर्मी अन् राजकीय शक्ती यांनी आटोकाट प्रयत्न केले. आम्ही केवळ मूठभर भक्तांच्या साहाय्याने कायदेशीर लढा चालू केला. त्यामुळे हळूहळू संपूर्ण केरळमध्ये ही चळवळ पसरली. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संस्था यांनी पाठिंबा दिला. साम्यवादी संघटना आणि इतर धर्मीय यांनी महिलांना प्रवेश देण्यासाठी अनेक प्रयत्न केले; पण ते हाणून पाडले.