केरळच्या माकप सरकारचे मंत्री सुरेंद्रन् यांच्याकडून खेद व्यक्त करण्याचे नाटक !
केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने आता माकपवाले हिंदूंची मते मिळण्यासाठी ढोंगी खेद व्यक्त करत आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत ! माकपला खरेच खेद वाटत असेल, तर सरकारने तसे अधिकृत घोषित करून सर्वोच्च न्यायालयात १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करावा !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिरामध्ये वर्ष २०१८ मध्ये महिलांच्या प्रवेशाच्या संदर्भात घडलेली घटना एक बंद अध्याय आहे. असे व्हायला नको होते, अशा शब्दांत राज्यातील माकपचे नेते आणि सरकारमधील मंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन् यांनी निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी खेद व्यक्त केला आहे. वर्ष २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला होता. या प्रवेशाला भक्तांचा विरोध होता.
🚩 जागो !🚩#शबरीमला मंदिर में महिलाआें को प्रवेश नहीं मिलना चाहिए था ! – #केरल के मंत्री के. सुरेंद्रन्
हिन्दुआें के मतों के लिए #सीपीएम का नाटक !https://t.co/k7kKca4LUY#Sabarimala #SaturdayThoughts #SaturdayMotivation pic.twitter.com/TmtGyuCOaj
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) March 13, 2021
सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाच्या विरोधात आव्हान देण्यात आल्यावर पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. याविषयी सुरेंद्रन् म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय आला, तरी आमचे सरकार लोकांशी चर्चा करूनच त्याची कार्यवाही करण्याचा विचार करील.