गोवा : दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक २९ जुलैनंतर पूर्ववत् होणार

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा मातीने भरला असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भीषण उष्णतेमुळे ग्रीसच्या जंगलात लागलेली आग विझवतांना विमान दुघर्टनाग्रस्त !

भीषण उष्णतेमुळे अनेक दशकांचा विक्रम मोडणार्‍या युरोपीय देश ग्रीसची दैनावस्था झाली आहे. येथील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

बुलढाणा येथे बस दरीत कोसळलली, प्रवासी सुखरूप !

बुलढाण्यामधील राजूर घाटात एक बस दरीत कोसळली. यामध्ये ५५ प्रवासी होते. यामध्ये २ विद्यार्थी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गोवा : डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर

राज्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तसेच गावांचा संपर्क तुटला आहे. बर्‍याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

१५ दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास ‘रास्ता रोखा’आंदोलन

ग्रामस्थांनीही वारंवार तक्रारी केल्या, तरी त्याची दखल घेतली जात नाही. भविष्यात अपघात घडल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यासाठी उत्तरदायी रहातील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घरे, पूल, रस्ते, डोंगर खचल्याने हानी 

जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेती, बागायती यांसह खासगी आणि शासकीय संपत्तीची हानी झाली आहे.

सिंधुदुर्ग : कुडाळ येथे विजेच्या धक्क्याने वीजवितरणचे कर्मचारी गंभीर घायाळ

वीज वितरण आस्थापनाकडे कोणतीही आपत्कालीन यंत्रणा नसल्याने अपघातग्रस्त कर्मचारी श्री. फाले हे ४५ मिनिटे खांबावरच लोंबकळलेल्या स्थितीत होते !