वैनगंगा नदीत ८ महिला बुडाल्या !
नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा (लहान होडी) उलटला. त्यात बसलेल्या ८ महिला नदीपात्रात बुडाल्या.
नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा (लहान होडी) उलटला. त्यात बसलेल्या ८ महिला नदीपात्रात बुडाल्या.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारख्या घटना घडणे विश्वगुरुपदाकडे वाटचाल करणार्या भारतासाठी लज्जास्पद !
अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी हे विमान भारताचे असल्याचे वृत्त प्रसारित केले होते; मात्र भारत सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले.
हे स्फोट इतके भयंकर होते की, ५ किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. घायाळ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमात फिरू लागल्यानंतर बैलाने जेनिटोवर आक्रमण केल्याचे स्पष्ट ! जेनिटोच्या कुटुंबियांनी अन्वेषण यंत्रणेची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.
‘धिर्यो’त एकाचा बळी गेल्याने कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘धिर्यो’ चालू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. ‘धिर्यो’च्या आयोजनावर न्यायालयाची बंदी असतांनाही ‘धिर्यो’चे आयोजन केले जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे.
नायलॉन मांजावर बंदी असल्याने तो वापरणार्यांवर कारवाई करण्याऐवजी उड्डाणपूल बंद ठेवून अनेकांची गैरसोय करणे कितपत योग्य आहे ?
अशा जीवघेण्या वस्तूवर खरेतर भारतभरात बंदी घातली पाहिजे. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे !
खनिज वाहतूक करतांना सुरक्षारक्षक नेमण्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, तर याकडे खाण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.
साक्री तालुक्यात असलेल्या सामोडे परिसरात फरशी पुलावरून जाणार्या उसाच्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पाण्यात कोसळला. वाहकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रकमधून उडी घेतली.