आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात !
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर येथून श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी जात असतांना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कोल्हापूर येथून श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी जात असतांना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.
समृद्धी महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी परिवहन महामंडळाकडून ८ पथके, तर पोलीस आयुक्तालयांकडून १४ पथके सिद्ध केली आहेत. ४ सहस्र वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.
मद्य प्राशन करून गाडी चालवणार्यांना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
मध्य-पूर्व आणि आफ्रिका खंडातील अराजक स्थितीमुळे तेथील अनेक नागरिक युरोपमध्ये शरणार्थी म्हणून जात आहेत.
घटना १४ डिसेंबरची असून गंभीर घायाळ झालेल्या महिलेला विविध रुग्णालयांत नेऊन शेवटी सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु तिचे प्राण वाचवता आले नाहीत.
संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.
ससून रुग्णालयात उपचार चालू असलेल्या रुग्णांची शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी भेट घेतली. तळवडे घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.
कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ‘बालरथ’ ७ डिसेंबर या दिवशी सकाळी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. ‘बालरथ’मधील ३४ पैकी ४ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्या वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?