बुलढाणा येथे एस्.टी. आणि खासगी बसचा अपघात !
जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एस्.टी. बस आणि एक खासगी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.
जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एस्.टी. बस आणि एक खासगी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.
कला आणि संस्कृती मंत्री अन् कला अकादमीचे दायित्व सांभाळणारे गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट घेऊन कला अकादमीच्या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचीत टाकण्याची सूचना केली होती.
या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारासह निकृष्ट दर्जाची कामे, हे भाजपच्या विकसित भारताचे ‘मॉडेल’ आहे.’’
या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.
नामकरण सोहळ्याला उपस्थित राहून परतलेले महिला-पुरुष हे या ट्रॉलीतून प्रवास करत होते. वाटेत हा अपघात झाला.
एका फिटनेस कारखान्याचा इनव्हर्टर चालू झाल्यामुळे त्याचा वीजप्रवाह वीज कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणापर्यंत आला. त्यामुळेच वीज कर्मचार्याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण चौकशीअंती वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.
ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१६ वरील बाराबती पुलावरून बस कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.
श्रीनगर येथे बटवारा भागात झेलम नदीत १६ एप्रिलच्या सकाळी नौका उलटून झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. या नौकेतून ११ जण प्रवास करत होते.
कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते.