Bihar Lightning Deaths : बिहारमध्ये वीज पडून ११ जणांचा मृत्यू !

काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता !

नवी देहली : बिहारमध्ये गेल्या २४ घंट्यांत वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे हवामान खात्याने ओडिशा, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यांत पाऊस अन् गारपिट पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

एकीकडे पावसाची शक्यता असतांना देशातील काही राज्यांमधील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांमध्ये काही भागात तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.