चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर त्यांच्या कुटुंबियांना तत्कालीन समाज आणि सरकार यांच्याकडून मिळालेली वागणूक

चापेकर बंधूंना फासावर दिल्यावर काही दिवसांतच त्यांच्या वाड्याला आग लागली, ज्यात त्यांची बरीच संपत्ती आणि कागदपत्रे जळून गेली.

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …

देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी गौरव यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही ! – गोवर्धन हसबनीस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी कारागृहवास पत्करला, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळे कुणी कितीही आरडा-ओरडा केला, तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही, असे मनोगत भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष श्री. गोवर्धन हसबनीस यांनी व्यक्त केले.

…म्‍हणून आम्‍हाला बाँबचे आवाज काढावे लागतात ! – भगतसिंग यांचे बोल

२३ मार्च २०२३ या दिवशी ‘भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा बलीदानदिन’ आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन ! ‘२३ मार्च १९३१ या दिवशी सुप्रसिद्ध क्रांतीकारक भगतसिंग, त्‍यांचे सहकारी राजगुरु आणि सुखदेव यांना लाहोरच्‍या कारागृहात फाशी देण्‍यात आली.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक उभारणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे. आपले भाग्य आहे की, असे महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आले आहेत. त्यांनी ज्या भूमीतून इतिहास घडवला, अशा स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे.

प्रखर लढाऊ वृत्तीचा मार्ग अवलंबणारे बाबाराव सावरकर !

बाबाराव यांना सातत्‍याने विजेचा शॉक देण्‍यात येत होता; पण कोणत्‍याही छळाला कंटाळून त्‍यांनी आपला देश स्‍वातंत्र्याचा सशस्‍त्र क्रांतीचा मार्ग सोडला नाही. अशा या भारतमातेच्‍या वीरपुत्राचे १६ मार्च १९४५ या दिवशी निधन झाले. त्‍यांच्‍या स्‍मृतीदिनी विनम्र अभिवादन !

बिलासपूर (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलाकडून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा अवमान !

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रपुरुषांविषयी आदर न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !