बिलासपूर (छत्तीसगड) येथे अल्पवयीन मुलाकडून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा अवमान !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

बिलासपूर (छत्तीसगड) – येथील सिपट चौकात एका अल्पवयीन मुलाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा अवमान केला. पोलिसांनी या मुलाला अटक केली आहे. त्याला ज्या पुतळ्याचा अवमान केला त्या पुतळ्याच्या पाया पडण्यास भाग पाडण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात एक अल्पवयीन मुलगा पुतळ्याजवळ जाऊन सिगारेट ओढत असून तो सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या चेहर्‍यावर धूर सोडतांना, तसेच त्यांच्या तोंडात सिगारेट धरतांना दिसत आहे. या मुलाला अटक करण्यात आल्यावर दुसरा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात हा मुलगा पुतळ्याची स्वच्छता करतांना आणि पुतळ्याच्या पाया पडतांना दिसत आहे.

संपादकीय भूमिका 

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रपुरुषांविषयी आदर न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !