राज्यात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाद्वारे राष्ट्रपुरुषांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोचवले जाणार !
अगणित हुतात्म्यांचा त्याग आणि बलीदान यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आपण समारोप करणार आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद़्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रशासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या सांगतेच्या निमित्ताने देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे.