इतर मागासवर्गीय समाजाचे राखीव आरक्षण वगळून निवडणुका घेण्यात येऊ नयेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण, विधीमंडळात एकमताने ठराव संमत

मराठा आरक्षणाची भीक नको, आमच्या बौद्धिक क्षमतेवर यश खेचून आणू ! – नानासाहेब पाटील, माजी अतिरिक्त मुख्य सचिव

नानासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सध्या शेती अनेक संकटातून जात आहे. आगामी काळात ती उदरनिर्वाहाचे साधन होणार नाही. विहिर काढण्यासाठी कर्ज घेऊ नका, तर मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्या.

धर्मांतरानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते ! – मद्रास उच्च न्यायालय

एका धर्मातून दुसर्‍या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडीत एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला; मात्र त्याच वेळी आरक्षणाचा लाभ मिळवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही फेटाळून लावली.

(म्हणे), ‘मुस्लिम आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरावे का ?’ – असदुद्दीन ओवैसी, खासदार, एम्.आय.एम्.

मुसलमानांची सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता न्यायालयाने मान्य केली आहे, तर अडचण काय आहे ? आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आम्हीही (मुसलमानांनी) रस्त्यावर उतरावे का ? तुम्हालाही तेच हवे आहे का ?’,- खासदार ओवैसी

आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाची अट असलेला वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्नमर्यादेचा आकडा हवेतून आणला का ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न

या प्रश्‍नावर स्पष्टीकरण न देता आल्याने ‘समाधानकारक उत्तर न मिळाल्यास हे आरक्षण घोषित करणारा अध्यादेशच स्थगित करू’, अशी चेतावणी न्यायालयाने दिली.

आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

आपल्या देशात प्रत्येकाला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही, समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकर्‍याच नाहीत, तर त्यात आरक्षण कुठून देणार ?..

मराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही ! – पंकजा मुंडे यांची भगवानगडावर घोषणा

मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही, अशी घोषणा भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, असे घोषित केले होते.

ओबीसी आरक्षणाच्या आडून षड्यंत्र रचणार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, राष्ट्रीय सचिव, भाजप

संभाजीनगर येथे ‘ओबीसी जागर मेळावा’

इतर मागासवर्गीय समाजाविषयीची सखोल माहिती महाराष्ट्र शासनाला देण्यास केंद्रशासनाचा नकार !

इतर मागासवर्गीय समाजाची मते मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील त्यांचे आरक्षण पुन्हा प्राप्त करणे राज्यशासनासाठी महत्त्वाचे ठरणार होते; मात्र या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसाठी अडचण निर्माण झाली आहे.

इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी !

राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असली, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी समाप्त झाला आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय आरक्षणानुसार नव्याने अर्ज भरण्यात येणार का ?