मराठा आरक्षणाची भीक नको, आमच्या बौद्धिक क्षमतेवर यश खेचून आणू ! – नानासाहेब पाटील, माजी अतिरिक्त मुख्य सचिव

पुणे – मराठा समाजाचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यासाठी आरक्षणाची मागणी करत बसण्यात अर्थ नाही. उलट आपल्या ताकदीवर, बौद्धिक क्षमतेवर, कौशल्यावर आणि ज्ञानावर यश खेचून आणले पाहिजे. त्यासाठी ‘सारथी’सारखी संस्था कार्यरत असून, समाजातील युवक-युवतींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या वतीने (सारथी) छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यू.पी.एस्.सी.) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि पी.एच्.डी.ची पदवी मिळालेल्या संस्थेच्या ‘फेलोशिप’धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

नानासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सध्या शेती अनेक संकटातून जात आहे. आगामी काळात ती उदरनिर्वाहाचे साधन होणार नाही. विहिर काढण्यासाठी कर्ज घेऊ नका, तर मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्या.