|

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी २७ टक्के जागा राखीव आहेत. या राखीव जागांचे आरक्षण वगळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असा ठराव २७ डिसेंबर या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद यांमध्ये एकमताने संमत करण्यात आला. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर विधान परिषदेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा ठराव मांडला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्यासाठी समाजाविषयी सर्वंकष माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत, तसेच आरक्षण असलेल्या २७ टक्के राखीव जागांच्या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक घेण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. राज्यशासनाने इतर मागासवर्गीय समाजाविषयी सर्वंकष माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला दिले आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने इतर मागासवर्गीय समाजासाठीच्या राखीव जागा वगळून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यामुळे विधीमंडळामध्ये वरील ठराव करण्यात आला.
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई