नागपूर येथील रेशन दुकानदार संघाची चेतावणी

नागपूर – अंगठा घेऊन धान्य देण्यासाठी ‘पॉस मशीन’चा उपयोग थांबवत थेट धान्य वाटपाची अनुमती द्यावी; अन्यथा जिल्ह्यातील धान्य वितरण थांबवू, अशी चेतावणी रेशन दुकानदार संघाने दिली आहे. यासाठी निवेदन देऊन १ मेपर्यंत शासनाने निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. शहरात जवळपास ६०० हून अधिक धान्य वितरक आहे. धान्य वितरकांनी कोरोनाच्या भीतीमुळे अंगठा (थम्ब) घेऊन दिले जाणारे धान्य वाटप थांबवले आहे. रेशन दुकानदार संघ कार्यालयात ‘पॉस मशीन’ जमा केले आहे. यामुळे शासनाच्या वतीने निर्णय न घेतल्यास सर्व दुकानदार हे धान्य वितरण थांबवतील, अशी चेतावणी संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत केव्हाही धान्य पुरवठा थांबून वितरण व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी