३३ लाखांचा ऐवज शासनाधीन !
अवैध पशूवधगृहे आणि गोमांस वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये कायम धर्मांधच पकडले जातात. अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्ह्यामध्ये बहुसंख्य ! धर्मांधांवर कठोरात कठोर कारवाई होत नसल्याचाच हा परिणाम आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
भिगवण (तालुका इंदापूर) – येथील अनधिकृतरित्या चालू असलेल्या पशूवधगृहावर १८ एप्रिल या दिवशी पहाटे भिगवण पोलिसांनी धाड टाकून ३२ लाख ८५ सहस्र रुपयांचा ऐवज शासनाधीन केला आहे. या कारवाईत पशूवधगृहातील तिघांना कह्यात घेतले असून इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तौसिफ कुरेशी, आयाज काझी आणि अहमद शेख अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या धाडीमध्ये पोलिसांनी १५ लहान मोठी वाहने आणि गोमांस, असा एकूण ३२ लाख ८५ सहस्र रुपयांचा ऐवज शासनाधीन केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ नुसार गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.