शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे सोलापूर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

सोलापूर, २३ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वेळेत उपलब्ध व्हावा, तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तात्काळ करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

सुरक्षितता आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याविषयी त्रयस्थ ऑडिट करून घ्यावे, तसेच दोन्ही यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र शहरामध्ये मनपा आयुक्त यांच्याकडे, तर ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे. दोन्हीकडील प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांच्याकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.